मालवणी फिश करी (Malvani Fish Curry)
कोकण आणि केरळच्या खास माशांच्या रस्स्याची तुलना करा. मालवणी फिश करी विरुद्ध केरळ फिश करी – साहित्य, चव, पद्धत आणि आरोग्यदृष्ट्या फायदे जाणून घ्या.
Prep Time 20 minutes mins
Cook Time 30 minutes mins
Total Time 50 minutes mins
Course Main Course
Cuisine Indian
Servings 4
Calories 250 kcal
- 500 ग्रॅम मासे सुरमई / बांगडा / पापलेट
- 2 मध्यम कांदे बारीक चिरलेले
- 1 मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला
- 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
- 1/2 चमचा हळद
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा मालवणी मसाला
- 3 –4 कोकम फुलं
- 2 चमचे ओलं नारळ वाटून
- मीठ चवीनुसार
- 3 चमचे तेल
- कोथिंबीर सजावटीसाठी
सर्वप्रथम मासे स्वच्छ धुवून त्यात मीठ, हळद लावून 10 मिनिटे मुरवून ठेवा.
कढईत तेल गरम करून कांदे परतवा, गडद सोनेरी होईपर्यंत.
त्यात आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून 5 मिनिटं परता.
हळद, तिखट, मालवणी मसाला टाकून मिश्रण शिजवा.
वाटलेला नारळ आणि कोकम टाकून 1 कप पाणी घाला.
उकळी आली की मासे घालून मध्यम आचेवर 10–12 मिनिटं झाकण ठेवून शिजवा.
शेवटी कोथिंबीर टाकून गरम गरम भातासोबत सर्व्ह करा.
- कोकम ऐवजी चिंच वापरू नका.
- कोळंबी (prawns) वापरूनही हीच रेसिपी करता येते.
- थोडं तेल कमी करून आरोग्यदायी पर्याय बनवता येतो.